Powered By Blogger

Thursday, February 25, 2010


जधी दाटतो पूर्णतः अन्धकार |
दिसे मार्ग ना लक्ष्य सर्वस्वी दूर ||
आशा संकटी कोणी ना घाबरावे |
शिवाजी चरित्रास भावे स्मरावे ||

असंख्यात गेले विरोद्हत लोक |
तरी घालणेना यमलाही भिक ||
जारी सागर एवढे म्लेंच्छ आले |
शिवाजी आणि मावळे नाही भ्याले ||

करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेवू |
असा सह्यनिर्धार चित्तात ठेवू ||
शिवाजी आपत्ति पुढे नाही झुकले |
जगी हिन्दवी राज्य निर्माण केले ||

सुखाला आधी लाथ मारा ध्रृतीने |
उठा मार्ग चला कडया निश्चायाने ||
जगी गांडुळासारखे ना जगावे |
उरी बाजी तानाजीला संस्मरावे ||

नका भिक घालू कधी संकटाला |
उठा ठोकारा येई ते ज्या क्षणाला ||
मनाला नसावा कधी भिती स्पर्श |
जिजाऊसुताचा जगुया आदर्श ||

महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |
जयांच्या भितीने जळे म्लेंच्छ बाधा ||
नूरे देश अवघा ज्याचे आभावी |
शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी ||

जिथे मोगरा तेथ राहे सुवास |
जिथे कृष्ण तेथे जयाश्री निवास ||
शिवाजी जपू मंत्र आर्त मतीनी |
शिवाजी तिथे माय तुळजाभवानी ||

चाहू बाजुनी वादळे घेरतील |
कूणीही सवे सोबतीला नसेल ||
दिशा वाट सर्वस्वहि हारविता |
शिवाजी असे मंत्र हा शक्ति दाता ||

करी खड्ग घ्या धर्म रक्षावयाला |
यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला ||
उठा फडकवा दिल्लीवरती निशान |
स्मरा अंतरी नित्य शिवसुर्यआण ||

उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||

4 comments:

  1. नमस्कार ,
    पाचोळा क्षमा करा हं मला आपले नाव माहित नाही म्हणून असे लिहावे लागते आहे.
    मला आपले लेख खूपच आवडले. आपण खूप अभ्यासपूर्ण लिहिता.
    असेच लिहित जा ! माझ्या तुम्हाला शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. @MANSHIMPALA ......SADAR SHLOK ADARNIY BHIDE GURUJINCHE AHE...@ABHIJIT JI NE TE BLOG MADHE SAMAVISHT KELELE AHE..TYABADHAL TYANCHE ABHAR....

    ReplyDelete
  3. MARATHA BOYS NO COMPRAMISE !!!!!!!!!VICKYS!!!!!!!

    ReplyDelete