Powered By Blogger

Saturday, February 20, 2010


++ अभिषेक मंत्र ++
हिंदुत चेतावू उठा शिवसुर्य जाळ |
जो जाळ जाळिल पूरे अरिम्लेंच्छ कुळ ||
ह्या लक्षपुर्तिस्तवही जगणे जयांचे |
हे राष्ट्र निर्मू असल्या शिवशार्दुलांचे ||११||

संभाजी मंत्र तद्वत उरी ज्या शिवाजी |
मारेल मृत्यु वरही रणी नित्य बाजी ||
हे हिंदुराष्ट्र करण्या रविवत ज्वलंत |
हे बीजमंत्र भिनवू मनशोणितात ||१२||

निष्ठा अभंग उरी ठेवुनी मार्ग चला |
आव्हान देवुनी उठा नित संकटाला ||
आशिष देईल तुम्हा तुळजभवानी |
जिंका आदेश दिधला शिवभुपतिनी ||१३||

देहास मानूनी जगा नित पायपोस |
झुन्झा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे ह्रुद्गत कठुनी |
संदेश अन्तिम दिला शिवभुपतीनी ||१४||

कशासाठी अणि जगावे कसे मी ? |
विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी ||
जगू पांग फेडावया मायभुचे |
आम्ही मार्ग चालू जीजाऊ सुताचे ||१५||

1 comment: