Thursday, February 25, 2010
जधी दाटतो पूर्णतः अन्धकार |
दिसे मार्ग ना लक्ष्य सर्वस्वी दूर ||
आशा संकटी कोणी ना घाबरावे |
शिवाजी चरित्रास भावे स्मरावे ||
असंख्यात गेले विरोद्हत लोक |
तरी घालणेना यमलाही भिक ||
जारी सागर एवढे म्लेंच्छ आले |
शिवाजी आणि मावळे नाही भ्याले ||
करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेवू |
असा सह्यनिर्धार चित्तात ठेवू ||
शिवाजी आपत्ति पुढे नाही झुकले |
जगी हिन्दवी राज्य निर्माण केले ||
सुखाला आधी लाथ मारा ध्रृतीने |
उठा मार्ग चला कडया निश्चायाने ||
जगी गांडुळासारखे ना जगावे |
उरी बाजी तानाजीला संस्मरावे ||
नका भिक घालू कधी संकटाला |
उठा ठोकारा येई ते ज्या क्षणाला ||
मनाला नसावा कधी भिती स्पर्श |
जिजाऊसुताचा जगुया आदर्श ||
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |
जयांच्या भितीने जळे म्लेंच्छ बाधा ||
नूरे देश अवघा ज्याचे आभावी |
शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी ||
जिथे मोगरा तेथ राहे सुवास |
जिथे कृष्ण तेथे जयाश्री निवास ||
शिवाजी जपू मंत्र आर्त मतीनी |
शिवाजी तिथे माय तुळजाभवानी ||
चाहू बाजुनी वादळे घेरतील |
कूणीही सवे सोबतीला नसेल ||
दिशा वाट सर्वस्वहि हारविता |
शिवाजी असे मंत्र हा शक्ति दाता ||
करी खड्ग घ्या धर्म रक्षावयाला |
यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला ||
उठा फडकवा दिल्लीवरती निशान |
स्मरा अंतरी नित्य शिवसुर्यआण ||
उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
Wednesday, February 24, 2010
स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवे जे |
स्वभाग्ये इथे जन्मालो मानिती जे ||
असा जन्महेतु जयांच्या उरात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
घराच्यावरी ठेवूनी तुळशीपत्र |
उरी धगधगे हिन्दवीराज्य मंत्र ||
जारी प्राण गेला तरी नही खंत |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
जरी घेरती वादळे संकटांची |
इतिश्री कराया पुरया जीवनाची ||
रणी पाडती जे यमाचेही दात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
कुठेही कधीही कुणाचीहि कांता |
तरीही तिला मानिती जन्ममाता ||
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
स्वधर्मास्तवे जे करी खड्ग घेती |
अरी जाळण्याला स्वये आग होती ||
पिते शस्त्र ज्यांचे रणी शत्रुरक्त |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
पथी दाट अंधार काटे सराटे |
मानी संकटांची क्षिती शुन्य वाटे ||
मरुताहुनी धावती जे नितांत |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
उरी राष्टभक्ती रविवत ज्वलंत |
न ये भीती चित्ती जरी ये कृतांत ||
सदा सिद्ध करण्या रणी म्लेंच्छअंत |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
आदित्यास ठावा नसे अंधःकार |
जयाना तसा स्पर्शतो ना विकार |
असे वज्रनिर्धार ज्यांच्या उरात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
जरी प्राण गेला तरी शब्द पाळू |
अविश्रांत देशास्तवे घाम गाळू ||
हाटू ना फिरू मागुती सतपथात |
शिवाजी असे आमुची जन्मजात ||
नव्हे अन्नपाणी नव्हे स्वर्णखाणी |
आम्हा ना जगी रोखू शकतात कोणी ||
नसे हिन्दुराष्ट्रा विना सत्य अन्य |
नसे हिन्दुराष्ट्रा विना धर्म अन्य |
नसे हिन्दुराष्ट्रा विना ध्येय अन्य|
नसे हिन्दुराष्ट्रा विना कार्य अन्य |
नसे हिन्दुराष्ट्रा विना स्वप्न अन्य |
तदार्थी आम्ही प्राशिले मातृस्तन्य ||
Tuesday, February 23, 2010
निश्चयाचा महामेरु
निश्चयाचा महामेरु | बहुत जनंसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||
नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती |
पुरंदाराणी शक्ति | पृष्ठाभागी ||
यशवंत किर्तिवंत | सामर्थ्यावंत वरदवंत |
पुण्यवंत नितीवंत | जाणता राजा ||
आचारशील विचारशील | दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठाई ||
धीर उदार गंभीर | शुर क्रियेसी तत्पर |
सावधपणे न्रुपवर | तुच्छ केले ||
देवधर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण |
ह्रुदयस्थ झाला | नारायण प्रेरणा केली ||
या भुमंडळाचे ठाई | धर्मरक्षी ऐसा नाही ||
महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||
कित्येका दुष्ट | संहारिला कित्येकासी धाक सुटला |
कित्येकास आश्रय जहाला| शिवकल्याणराजा ||
- समर्थ रामदास
Monday, February 22, 2010
Sunday, February 21, 2010
समर्थरामदासांनी छत्रपती संभाजीराजांना केलेला उपदेश
अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||
काही उग्रस्थिती सांडावी| काही सौम्यता धरावी| चिंता लागावी परावी अंतर्यामी||२||
मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे| सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३||
पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना| तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४||
जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला| जन ठायी ठायी तुंबला| म्हाणिजे खोटे||५||
श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले| मग जाणावे फावले| गलीमासी||६||
ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए| धीर धरून महत्कार्य| समजून करावे||७||
आधीच पडला धस्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती| याकारणे समस्ती| बुद्धि शोधावी||८||
राजी राखता जग| मग कार्यभागाची लगबग| ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९||
सकळ लोक एक करावे| गलीम निपटुन काढावे| ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०||
आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके| ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११||
समय प्रसंग वोळखावा| राग निपटुन काढावा| आला तरी कळो नेदावा| जनांमध्ये||१२||
राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक| लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३||
बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्टे करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||
आहे तितुके जाताना करावे| पुढे आणिक मेळवावे| महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५||
लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी| चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६||
शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे| इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||
शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||
शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे||१९||
सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||२०||
त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१|
Saturday, February 20, 2010
++ अभिषेक मंत्र ++
हिंदुत चेतावू उठा शिवसुर्य जाळ |
जो जाळ जाळिल पूरे अरिम्लेंच्छ कुळ ||
ह्या लक्षपुर्तिस्तवही जगणे जयांचे |
हे राष्ट्र निर्मू असल्या शिवशार्दुलांचे ||११||
संभाजी मंत्र तद्वत उरी ज्या शिवाजी |
मारेल मृत्यु वरही रणी नित्य बाजी ||
हे हिंदुराष्ट्र करण्या रविवत ज्वलंत |
हे बीजमंत्र भिनवू मनशोणितात ||१२||
निष्ठा अभंग उरी ठेवुनी मार्ग चला |
आव्हान देवुनी उठा नित संकटाला ||
आशिष देईल तुम्हा तुळजभवानी |
जिंका आदेश दिधला शिवभुपतिनी ||१३||
देहास मानूनी जगा नित पायपोस |
झुन्झा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे ह्रुद्गत कठुनी |
संदेश अन्तिम दिला शिवभुपतीनी ||१४||
कशासाठी अणि जगावे कसे मी ? |
विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी ||
जगू पांग फेडावया मायभुचे |
आम्ही मार्ग चालू जीजाऊ सुताचे ||१५||
Tuesday, February 16, 2010
** अभिषेक मंत्र**
कित्येक दीप विझले जरी या जगात |
तळपे कधी न विझता रवि या नभात ||
निर्मू असंख्य ह्र्दयी शिवसूर्यज्वाला |
सर्वस्व देतील स्वये क्षणी मायभूला ||१||
माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त |
राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त ||
चित्तात साठवू सदा शिवभुपतीस |
काळास जिंकिल असा घडवू स्वदेश ||२||
रक्तात बिम्बवू उठा अरिसुडत्वेष |
त्या वाचुनी ना तिकतो कधीही स्वदेश ||
जाळू गलिच्छ क्लिबवत अवघे विटाळ |
राष्ट्रार्थ निर्मू अवघ्या शिवभूपजाळ ||३||
इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे |
ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे ||
संपूर्ण नाश अरीचा जरी ना कराल |
विश्वात राष्ट्र म्हणूनी कधी ना टिकाल ||४||
शिवबा कशास्तव कसे जगले स्मरुया |
शिवभूप मार्ग विजयार्थ उठा धरुया ||
मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास |
विजयी रणात करुया भगव्या ध्वजास ||५||
राष्ट्रार्थ जीवन जगू प्राण हा अभंग |
आपत्ती दुःख भवती असता अथांग ||
सर्वस्व अर्पण करु आम्ही मायभूस |
निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ||६||
आकाशी सूर्य म्हणुनी ऋतुचक्र चाले |
पाण्यामुळे जगती मत्स्य जिवंत ठेले ||
देहात सुर्य म्हणुनी आम्ही जिवमान |
शिवसुर्य चित्ती धरुनी बनू राष्ट्रवान ||७||
राष्ट्रार्थ हाती धरणे शिवखङगधारा |
पाळेमुळे समूळ जाळुनी शत्रु मारा ||
वधण्या अभंग ध्रुतीने रणी म्लेंच्छ दैत्य |
सिंहसमान जगले 'शिवसुर्य' नित्य ||८||
भगवा करात धरिला कधीही ना सोडू ||
हिंदुत्व शत्रु सगळे हुडकुनी गाड़ू ||
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात |
रणकंदनी फडकवू भगवा जगात ||९||
दीपात तेल नसता न पड़े प्रकाश |
निष्ठा विना न तगडा बनतो स्वदेश ||
हिंदू समाज मतिह्र्द करण्या स्वतंत्र |
'शिवबा' विना न दूसरा बलशाली मंत्र ||१०|
Thursday, February 11, 2010
=== ध्येय मंत्र ===
शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|
या उपरी आता विशेष|काय लिहावे||
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|
शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|
या उपरी आता विशेष|काय लिहावे||
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|
=====प्रेरणा मंत्र=====
धर्मासाठी झुंजावे|झुंझोनी अवघ्यासी मारावे ||
मारिता मारिता घ्यावे|राज्य आपुले||
देशद्रोही तितुके कुत्ते|मारोनी घालावे पराते|
देवदास पावती फत्ते|यदार्थी संशयो नाही||
देव मस्तकी धरावा|अवघासी हलकल्लोळ करावा|
मुलुख बडवावा की बुडवावा|धर्म संस्थापनेसाठी||
-------------------------
Subscribe to:
Posts (Atom)