Powered By Blogger

Tuesday, February 16, 2010

** अभिषेक मंत्र**



कित्येक दीप विझले जरी या जगात |
तळपे कधी न विझता रवि या नभात ||
निर्मू असंख्य ह्र्दयी शिवसूर्यज्वाला |
सर्वस्व देतील स्वये क्षणी मायभूला ||१||

माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त |
राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त ||
चित्तात साठवू सदा शिवभुपतीस |
काळास जिंकिल असा घडवू स्वदेश ||२||

रक्तात बिम्बवू उठा अरिसुडत्वेष |
त्या वाचुनी ना तिकतो कधीही स्वदेश ||
जाळू गलिच्छ क्लिबवत अवघे विटाळ |
राष्ट्रार्थ निर्मू अवघ्या शिवभूपजाळ ||३||

इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे |
ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे ||
संपूर्ण नाश अरीचा जरी ना कराल |
विश्वात राष्ट्र म्हणूनी कधी ना टिकाल ||४||

शिवबा कशास्तव कसे जगले स्मरुया |
शिवभूप मार्ग विजयार्थ उठा धरुया ||
मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास |
विजयी रणात करुया भगव्या ध्वजास ||५||

राष्ट्रार्थ जीवन जगू प्राण हा अभंग |
आपत्ती दुःख भवती असता अथांग ||
सर्वस्व अर्पण करु आम्ही मायभूस |
निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ||६||

आकाशी सूर्य म्हणुनी ऋतुचक्र चाले |
पाण्यामुळे जगती मत्स्य जिवंत ठेले ||
देहात सुर्य म्हणुनी आम्ही जिवमान |
शिवसुर्य चित्ती धरुनी बनू राष्ट्रवान ||७||

राष्ट्रार्थ हाती धरणे शिवखङगधारा |
पाळेमुळे समूळ जाळुनी शत्रु मारा ||
वधण्या अभंग ध्रुतीने रणी म्लेंच्छ दैत्य |
सिंहसमान जगले 'शिवसुर्य' नित्य ||८||

भगवा करात धरिला कधीही ना सोडू ||
हिंदुत्व शत्रु सगळे हुडकुनी गाड़ू ||
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात |
रणकंदनी फडकवू भगवा जगात ||९||

दीपात तेल नसता न पड़े प्रकाश |
निष्ठा विना न तगडा बनतो स्वदेश ||
हिंदू समाज मतिह्र्द करण्या स्वतंत्र |
'शिवबा' विना न दूसरा बलशाली मंत्र ||१०|

No comments:

Post a Comment